नारायणगाव हायवे चे उपाध्यक्ष व हर्षली कृषी उद्योग चे मालक माननीय श्री नारायण जी आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षा किट चे वाटप

  ओतूर,जुन्नर प्रतिनिधी
   मनोहर हिंगणे

आज दिनांक 6/ 9/ 2019 रोजी रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे उपाध्यक्ष व  हर्षली कृषी उद्योग चे मालक उद्योजक माननीय श्री नारायण जी आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब नारायणगाव हायवे चे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब गिलबिले व सर्व रोटरीचे संचालक ,सर्व कंपनीचे प्रतिनिधी ,राजे प्रतिष्ठान चे निलेश दळवी व  सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

        या कार्यक्रमासाठी खास शेतकऱ्यांसाठी सिजेंटा व सल्फर मिल्स या कंपनीने सेफ्टी किट ( फवारणी सुरक्षा किट) चे पन्नास शेतकऱ्यांना वाटप केले .त्यासाठी सिजेंटा कंपनीचे प्रतिनिधी श्री सानप साहेब व सल्फर मिल्स कंपनीचे प्रतिनिधी कैलास विघ्ने साहेब यांनी विशेष सहकार्य केले . तसेच श्री अल्हाट सर यांनी सर्वांचे मनोरंजनासाठी सुमधुर गाण्यांचा आर्केस्ट्रा चे नियोजन केले .

       या कार्यक्रमात शामराव आन्ना थोरात ,बाळासाहेब गिलबिले ,निलेश दळवी ,राम भालेराव ,अल्हाट सर ,अमोल हिरे ,अमोल आल्हाट ,नाना वर्पे ,रवींद्र वाजगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले 


       या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र वायकर ,संदीप नेहरकर ,गणेश गावडे ,सतीश नेहरकर , मच्छिंद्र नेहरकर ,निखिल काशीद ,पवन वायकर ,गोविंद नेहरकर ,महेश ढवळे ,गणेश शेटे ,कैलास वाणी , सुकाजी मुळे ,शिवाजी कुमकर , विवेकानंद येेलुरकर ,श्री गणेश भाऊ कोल्हे ,सेेवेंद्र शेठ वाव्हळ ,योगेश डेरे , मारुती मुंढे गुरुजी,
 दयानंद काशिद , सचिन काशिद
मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

      तसेच सत्कार मूर्ती श्री नारायण आरोटे व सौ सोनाली आरोटे यांनी आभार व्यक्त करताना इथून पुढे हर्षली कृषी उद्योग च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेती विषयक जास्तीत जास्त सेवा पुरवण्याची ग्वाही दिली व सेंद्रिय शेती विषमुक्त शेती करण्याचा मानस बोलून दाखवला

Post a Comment

0 Comments